अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जळगाव जिल्हा माध्यमिक कार्यकारणी स्थापना. -जिल्हाध्यक्ष पदी शेख जाकीर, सरचिटणीस मुश्ताक मुनाफ, कार्याध्यक्ष मुस्ताक अली यांची निवड

24 प्राईम न्यूज 14 May 2025



जळगांव -उर्दू शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांसाठी पूर्ण देशात कार्यरत असलेली अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची जळगांव जिल्हा माध्यमिक कार्यकारणी स्थापना करण्यात आली.मंगळवार, दिनांक १३ मे रोजी अँग्लो-उर्दू हायस्कूल मध्ये संस्थेचे संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आला होता.जिल्हाध्यक्ष प्राथमिक जळगाव मोहसीन खान यांनी उद्देश आणि ध्येय सादर केला.नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष तय्यब इब्राहिम शेख, विभाग उपाध्यक्ष जहीर अहमद जहीर, विभाग संपर्क प्रमुख शाहिद फरहान,सल्लागार शेख इम्रान आसिफ या सर्वांच्या प्रयत्नांनी झालेली ही शैक्षणिक सभेमध्ये,जळगाव जिल्हा माध्यमिक कार्यकारणी साठी शेख जाकीर बशीर ,उपशिक्षक इकरा शाईन उर्दू हायस्कूल यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.एरंडोल येथील मुश्ताक अहमद अब्दुल मुनाफ नॅशनल उर्दू गर्ल्स हायस्कूल यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली. आणि धरणगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुश्ताक अली मोहब्बत अली यांची कार्यकारीअध्यक्ष म्हणून निवड झाली. बैठकीत धरणगाव येथील अँग्लो उर्दू स्कूलचे मोहसीन शाह अकील शाह यांची उपाध्यक्षपदी, एरंडोल येथील शेख अझरुद्दीन शहाबुद्दीन अँग्लो उर्दू हायस्कूल यांची उपाध्यक्षपदी आणि यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे अर्शद खान हमीद खान शिकलकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीत,अल-हिरा उर्दू हायस्कूल,भुसावळ येथील अल्तमश खान हनीफ खान यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली, तर डॉ.अनिसुद्दीन अलाउद्दीन शेख, इकरा उर्दू हायस्कूल, सालार नगर, जळगाव यांची संघटक पदी निवड करण्यात आली.शरीफ खान अयुब खान अँग्लो उर्दू हायस्कूल जळगाव यांना प्रसिद्धी प्रमुखपद देण्यात आले. तस्लीम शेख रजाक, नॅशनल उर्दू हायस्कूल एरंडोल, शिक्षक नेता पदी निवड झाली.जिया-उन-निसा गुलाम दस्तगीर,इकरा पब्लिक हायस्कूल महाडी जळगाव ,महिला प्रतिनिधी,मुमताज अत्ताउल्ला खान,इकरा शाहीन उर्दू हायस्कूल जळगाव,महिला प्रतिनिधी पदी निवड झाली.महंमद वसीम मुहम्मद जमील, वाय.एम. खान उर्दू हायस्कूल भडगाव जिल्हा संघटक, साजिद खान रफीक खान, मिल्लत हायस्कूल जळगाव, यांची जिल्हा संघटक म्हणून निवड झाली आहे. तसेच फरजाना शाह यांची विभागीय महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.असलम शेख त्यांची सुद्धा विभागीय संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संस्थेचे संस्थापक साजिद निसार अहमद आणि पाहुण्यांनी निवडीचे पत्र दिले. या बैठकीत विभागाचे नवनिर्वाचित सदस्य, नवनिर्वाचित मुख्याध्यापक, नवनिर्वाचित केंद्रप्रमुख, नवनिर्वाचित पतपेढी सदस्य सलीम शेख आणि नवनिर्वाचित पतपेढी सदस्य मुश्ताक अली यांचे सत्कार करण्यात आले. तसेच शारिक जुबेर,यांना प्राथमिक शिक्षक नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली विशेष पाहुणे म्हणून अशफाक खान राष्ट्रीय अध्यक्ष, रिजवान चमन शेख अध्यक्ष महाराष्ट्र,शेख इलियास असगर उपाध्यक्ष महाराष्ट्र, डॉ.नूर इलाही शाह नाशिक विभाग अध्यक्ष, अब्दुल करीम सालार अध्यक्ष इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव, इजाज अहमद अब्दुल गफ्फार मलिक अध्यक्ष,अंजुमन तालीम मुस्लिमीन जळगाव,फारूक शेख अध्यक्ष,मनियार बिरादरी जळगांव,मिर्झा रिजवान जिल्हा अध्यक्ष नाशिक, राज्य अध्यक्ष मध्य प्रदेश हाजी शहजाद अली सय्यद, अध्यक्ष मध्य प्रदेश प्राथमिक व इतर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमात मुश्ताक अली यांनी कुराण पठण केले, अझरुद्दीन शेख यांनी नात सादर केली, जहीर अहमद झहीर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन इम्रान आसिफ यांनी केले.