अमळनेर मध्ये शिवसेनेकडून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन आज.

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर शहरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार दिनांक 21 मे रोजी सकाळी 8 वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना अमळनेर शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही रॅली तिरंगा चौक ते महाराणा प्रताप चौक या मार्गावर नियोजित आहे.

देशाच्या सीमेवर सुरु असलेल्या युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आपल्या शूर सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी चारचाकी व दुचाकी वाहनांवर तिरंगा लावून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमामागील प्रमुख प्रेरणा म्हणजे सीमारेषेवर झुंजणाऱ्या भारतीय जवानांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे व देशभक्तीचा जागर सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण करणे.
या रॅलीचे प्रमुख संयोजक वासुदेव पाटील (जिल्हा प्रमुख), सुरेश अर्जुन पाटील (तालुका प्रमुख), व संजय कौतिक पाटील (शहर प्रमुख) यांनी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संपर्कासाठी प्रदीप – 9699896939 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.