कोविड-19 पुन्हा बळावला! आशियाई देशांत रुग्णसंख्येत वाढ, भारतातही अलर्ट..

24 प्राईम न्यूज 21 May 2025

हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड आणि चीनमध्ये कोविड-19 च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या देशांमध्ये संसर्गदर झपाट्याने वाढत असल्याने भारतातही सतर्कता वाढवण्यात आली आहे.

हांगकांगमध्ये गेल्या 10 आठवड्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत तब्बल 30 पट वाढ झाली आहे. सिंगापूरमध्ये केवळ एका आठवड्यात संसर्ग दर सुमारे 30 टक्क्यांनी वाढला आहे. चीन आणि थायलंडमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, भारतात सध्या 257 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 56, केरळमध्ये 69 आणि तामिळनाडूमध्ये 34 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याच दरम्यान, मुंबईच्या KEM रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.