“स्वतः हमाली करत 100 सिमेंट बॅग्स पोहोचवणारे उद्योजक! ताहा भाईंच्या जबरदस्त कामाचा आदर्श”

0


आबिद शेख/अमळनेर
आज Mundada Highstreet प्रोजेक्टवर एका उद्योजकाची कार्यपद्धती सर्वांसमोर प्रेरणादायी ठरली. अमळनेरमधील सुप्रसिद्ध बद्री हार्डवेअरचे मालक ताहा भाई बुकवाला यांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य याचं जिवंत उदाहरण समोर ठेवलं.

मुंदडा हाईट या अमेय मुंदडा यांच्या प्रोजेक्टसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या केमिकल सिमेंट बॅग्स त्वरित पोहोचवायच्या होत्या. मात्र त्यांच्या गोदामात त्या वेळेस हमाल उपलब्ध नव्हते.

यावर त्यांनी कोणताही उशीर न करता स्वतः 100 बॅग्स टेम्पोमध्ये भरल्या आणि त्या साइटवर नेऊन उतरवल्याही!

आमच्या थांबा, मदत करतो या विनंतीवर त्यांनी फक्त एवढंच सांगितलं:“बिज़नेस हमने शुरू किया है, अमेय भाई… किसी के भरोसे नहीं बैठ सकते… और खुद काम करने में कैसी शर्म !”
आणि स्वतः काम करणं कधीच लाजिरवाणं नसतं!”तहा भाई हे दाउदी बोहरा समाजात एक जबाबदार पदावर असून रोटरी क्लब अध्यक्ष असून

त्यांचं हे कृत्य केवळ कामासाठी नाही, तर एक मजबूत मानसिकता, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाचं उदाहरण आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!