“मैत्रीसाठी दिला जीव… इन्साफचं शौर्य काळजाला भिडणारं!”

0

आबिद शेख/ अमळनेर


रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89050/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 995/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

काल अमळनेरमध्ये काळजाला हादरवणारी एक घटना घडली. Mundada Builders मध्ये जेसीबी ठेकेदार म्हणून कार्यरत असलेल्या आजाद खान यांचा मुलगा, इन्साफ खान, याने आपल्या जिवलग मित्राचे प्राण वाचवले… पण स्वतःचा जीव गमावला.

धुळे येथील SVKM कॉलेजमध्ये B.Pharmacyच्या अंतिम वर्षात शिकणारा इन्साफ अभ्यासात तर हुशार होताच, पण मैत्रीतही तितकाच निस्वार्थ. काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. त्याचं एकच स्वप्न होतं — चांगलं शिकायचं, मोठं व्हायचं, आणि आपल्या आईवडिलांचा अभिमान वाटावा असं काहीतरी करायचं.

काल, मित्रांसोबत धरणावर गेलेला इन्साफ… मयूर गांगुर्डे या मित्राचा जीव वाचवताना पाण्यात बुडाला. त्याचा अखेरचा श्वास मैत्रीसाठी होता… शौर्यासाठी होता.

ही घटना केवळ अपघात नाही — ही आहे एका हिंदू-मुस्लिम मैत्रीच्या एका निस्वार्थ आणि उदात्त रूपाची साक्ष. ही आहे माणुसकीची जिवंत मिसाल.

इन्साफ गेला… पण त्याने आजच्या पिढीला मैत्रीचा आणि माणूसकीचा खरा अर्थ शिकवला.
त्याची आठवण आणि त्याचं त्यागमूल्य अमळनेर करांच्या मनात सदैव जिवंत राहील…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!