वक्फ बचाव समिती व वक्फ को ऑर्डिनेशन कमेटीच्या संयुक्त विद्यमाने. शुक्रवारी जळगावात वक्फ कायदा विरोधात जाहीर सभा..

24 प्राईम न्यूज 22 May 2025

सरकारने वक्फ अधिनियम २४ मध्ये संशोधन करून नवीन उम्मीद २५ नावाने वक्फ कायदा करून त्यास मान्यता घेतली आहे. त्या कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, दिल्ली ही सुप्रीम कोर्टात गेली असून हल्ली सुनावणी सुरू आहे.
सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असले तरी त्या कायद्या बाबत जन जागृती साठी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड जनते मध्ये सुद्धा जात आहे.
वक्फ कायद्या विरोधात सभा

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या मार्गदर्शना खाली जळगावातील वक्फ बचाव समिती व वक्फ को ऑर्डिनेशन कमिटी जळगाव च्या संयुक्त विद्यमाने जळगाव च्या ईद गाह मैदानावर शुक्रवार २३ मे रोजी संध्याकाळी ७.०० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बोर्डाचे वरिष्ठ पदाधिकारी करणार मार्गदर्शन
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ दिल्ली चे डॉ. कासिम रसूल इलियास तसेच बोर्डाचे सदस्य तथा दारुल कजा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अकोल्याचे मुफ्ती अशफाक व मालेगाव सुन्नी अश्रफ अकॅडमी चे प्रमुख अथहर हुसेन अश्रफी हे जळगावी येत असून त्यांचे मार्गदर्शन जळगाव करांना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
जिल्हाभरातील लोकांना आवाहन
ही जाहीर सभा अत्यंत वेळेत सुरू होणार असल्याने अत्यंत उपयोगी असल्याने जिल्ह्यातील लोकांनी मगरीब ची नमाज ईदगाह मैदानावर म्हणजे संध्याकाळी ७ वाजता अदा करावी म्हणजे कार्यक्रम वेळेत सुरू होऊन रात्री ९.४५ वाजता संपेल. तरी वेळेत उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजका तर्फे मुफ्ती हारून नदवीं, मुफ्ती खालिद, डॉ करीम सालार व फारुक शेख यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89050/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 995/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **