पहलगाम हल्ल्याला महिना पूर्ण, दहशतवादी मोकाटच! ११३ अटकेत, २० लाखांचे बक्षीस जाहीर..


24 प्राईम न्यूज 22 May 2025. हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकमधील दहशतवादी तळांवर कारवाई करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर भारत-पाक संघर्ष चिघळून काही दिवसांतच युद्धविराम लागू करण्यात आला. मात्र, या घटनेतील मुख्य ४ दहशतवादी अद्याप मोकाटच आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी विचारणा केली आहे की, “हल्ल्याला महिना उलटला तरी ४ दहशतवादी कुठे आहेत याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे.” त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पाठवलेले शिष्टमंडळ हे केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तपासात समोर आले आहे की, आदिल, मुसा आणि अली हे तिघे हल्ल्यात सहभागी होते आणि त्यांच्यावर प्रत्येकी २० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांची चौकशी झाली असून ११३ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र हल्ल्यातील चौघेही मुख्य दहशतवादी अजूनही पळूनच आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89050/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 995/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **