प्रो. डॉ. विनय जोशी यांना ‘नेशनल समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर | मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक आणि प्रा. डॉ. विनय पुरुषोत्तम जोशी यांना त्यांच्या बहुआयामी योगदानाबद्दल ‘नेशनल समाजरत्न’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा गौरव रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्या वतीने देण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा १८ मे रोजी धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष डॉ. प्रमोद पवार, अध्यक्ष डॉ. मनोहर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रो. जोशी हे प्रताप महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना शिक्षण, संस्कृती, क्रीडा व सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना रंगभूमीच्या माध्यमातून घडवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या नाट्यप्रयोगांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत.
या सन्मानानंतर विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.