पालिकेसमोरील दुकांनांना भीषण आग – अग्निशमन दलाची तत्परता, मोठा अनर्थ टळला

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
अमळनेर गुरुवारी सुमारे पावणे आठच्या सुमारास शहरातील पालिकेसमोरील ३ ते ४ दुकानांना अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आग लागलेल्या दुकानांमध्ये कटलरी, पाण्याचे जार, भांडी यांसारखे साहित्य होते, जे पूर्णतः जळून खाक झाले. दुकाने बंद असल्यामुळे आणि आग आतून लागल्यामुळे ती विझवताना अडथळे निर्माण झाले. त्यामुळे तातडीने पालिकेचा जेसीबी मागवून दुकानांची शटर फोडण्यात आली.
जवळच असलेला अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. सुदैवाने, आजूबाजूच्या इतर दुकानांना आग लागण्यापासून वाचवण्यात यश आले.