नालेसफाईचं काम अपुरं, रस्त्यावर गाळ आणि नागरिक त्रस्त..


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची साफसफाई सुरू केली आहे. मात्र, शहाआलम नगर भागात नाल्यांमधून काढलेला गाळ रस्त्यावरच टाकण्यात आल्याने परिसरात चिखल झाला असून, दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

काढलेली घाण उचलण्याकडे दुर्लक्ष झाल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून, आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अवकाळी पावसामुळे हा गाळ अधिकच पसरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रहदारीलाही अडथळा निर्माण होत असून, नगरपालिकेने तातडीने गाळ हटवावा व स्वच्छता करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.