गलवाडे रस्त्यावरून स्प्लेंडर दुचाकी चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील गलवाडे रस्त्यावरील ठगूबाई रिसॉर्टसमोरून लावलेली स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १९ मे रोजी रात्री घडली.

साने नगर भागातील रहिवासी नाना देविदास पाटील हे रात्री ९ वाजता कामानिमित्त ठगूबाई रिसॉर्ट येथे गेले होते. त्यांनी त्यांची अंदाजे २० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (क्र. GJ 05 FV 0051) रिसॉर्टसमोर उभी केली होती.
सुमारे तासभरानंतर, म्हणजेच १० वाजता परत आल्यावर त्यांना दुचाकी त्या ठिकाणी आढळली नाही. त्यांनी परिसरात मित्रांच्या मदतीने शोध घेतला, मात्र कुठलीही माहिती न मिळाल्याने दुचाकी चोरी झाल्याची खात्री पटली.
या प्रकरणी नाना पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **