अमळनेरमध्ये आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; जनतेच्या तक्रारींचे एकाच छताखाली निराकरण

आबिद शेख/अमळनेर

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर (ता. 23 मे): महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 23 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता इंदिरा भवन, स्टेट बँकच्या मागे, अमळनेर येथे होणार आहे.

या कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निराकरण एकाच छताखाली करण्यात येणार आहे.
या लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून आपल्या समस्या सादर कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर, गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर, तहसीलदार अमळनेर आणि उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग, अमळनेर यांनी केले आहे.