वक्फ बचाव मोहिमे अंतर्गत आज शुक्रवार रोजी जळगावत जाहीर सभा..

24 प्राईम न्यूज 23 May 2025


ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड आयोजित तथा जळगाव वक्फ बचाव समिती व वक्फ समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव ईदगाह मैदानावर संध्याकाळी ७ ते १० या वेळेत जाहीर सभा होत असून या सभेसाठी दिल्लीहून मौलाना डॉ सय्यद कासीम रसूल इलियास, अकोल्याहून मुफ्ती अश्फाक रहमानी, औरंगाबादहून औरंगाबादहून जीआउद्दीन सिद्दिकी व मालेगाव येथून अथहर हुसेन अश्रफी हे येत आहे.
वक्फ बचाव मोहिमे अंतर्गत जनजागृतीची ही जाहीर सभा असणार असल्याचे वक्फ समन्वय समितीचे डॉ. करीम सालार, वक्फ बचाव समितीचे फारुख शेख यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत व्यासपीठावर मुफ्ती हारून नदवी, मुफ्ती खालीद, मौलाना रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, मौलाना उमेर नदवी ,एजाज मलिक, सोहेल अजित सालार अनिस शहा, सोहेल आमिर, शाहिद सय्यद, खालिद बागवान, अयाजोद्दीन, रागिब जागीरदार आदींची उपस्थिती होती.
जाहीर सभेची रुपरेषा
२३ मे शुक्रवार संध्याकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत सदर जनजागृती सभा होत आहे.
मिनीट टू मिनिट कार्यक्रमाची घोषणा
७.३० ते ७.४५ कुराण पठण व नात तसेच अध्यक्षांची नियुक्ती.
८ ते ८.२० मौलाना अथर अश्रफी मालेगाव यांचे भाषण
८.२० ते ८.२५ तराना औरंगाबादचे मोहनिस
८.२५ ते ९.०० अकोला येथील मौलाना अशफाक रहमानी यांचे भाषण
९.०० ते ९.०५ तराना
९.०५ ते ९ ते ५० डॉ इलियास कासिम यांचे अध्यक्षीय भाषण.
पाऊस असला तरी सभा होणारच
हल्ली पावसाचे वातावरण असल्याने सभेपूर्वी अथवा सभा सुरू असताना पाऊस आला तरी कोणत्याही परिस्थितीत सभा रद्द अथवा थांबणार नाही व भर पावसात सुद्धा ईश्वराच्या प्रॉपर्टी साठी आपले स्वतःचे अस्तित्व विसरून पावसात सुद्धा जाहीर सभा होईलच त्यानुसार त्या इर्षेने लोकांनी मानसिक दृष्ट्या तयार होऊन सभेला यावे असे आवाहन मुफ्ती हारून नदवी, मुफ्ती खालिद, डॉ.करीम सालार व फारुख शेख यांनी या पत्रकार परिषदे द्वारे आवाहन केलेले आहे.
जाहीर सभेची तयारी पूर्णत्वाकडे
जाहीर सभेसाठी खुल्या प्रमाणातील ३० बाय २० चे व्यासपीठ तयार असून सुमारे २५ हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे माईक व लाईटची सुद्धा व्यवस्था जनरेटर द्वारे केलेली असून धर्मगुरू व जळगाव जिल्ह्यातील महनीय व्यक्तींना व सर्व सहभागी व्यक्तींना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पार्किंग साठी सालार नगर येथे व्यवस्था
बाहेर गावाहून येणारे चार चाकी वाहनांसाठी अजिंठा चौक ला लागून असलेल्या सालार नगर येथील इकरा उर्दू हायस्कूल ला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांनी याची नोंद घ्यावी.
शहरातील लोकांनी वाहनाचा उपयोग टाळावा
जळगाव शहरातील जाहीर सभेसाठी येणाऱ्या लोकांनी कृपया वाहनांचा वापर टाळावा किंवा वाहन आणल्यास ईदगाह कॉम्प्लेक्स च्या गळ्यामध्ये त्यांनी आपली दोन चाकी वाहने तसेच सालार नगर लगत असलेल्या हाजी अहमदनगरच्या ग्राउंड वर वाहने लावावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.