धुळे विश्रामगृहात सापडले १.८४ कोटी रुपये; राजकीय खळबळ

24 प्राईम न्यूज 23 May 2025

धुळे : जालन्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात मोठा गौप्यस्फोट झाला आहे. गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये तब्बल १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ही खोली खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी १५ मेपासून बुक केली होती. ही रोकड अंदाज समितीतील ११ आमदारांना वाटपासाठी आणली गेली होती, असा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा)चे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
गोटे यांनी प्रश्न उपस्थित केला की, “ही रोकड कुणाची आहे? खोली बुक का केली होती?” तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.