अमळनेरमध्ये समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 1000 पेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग..


आबिद शेख/अमळनेर
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हे अभियान अमळनेर तालुक्यात यशस्वीरित्या राबवण्यात आले. अमळनेर, मंगरुळ, अंतुर्ली, धार, रंजाणे व मालपूर या गावांतील नागरिकांसाठी अमळनेर शहरातील इंदिरा भवन मंगल कार्यालय येथे दिनांक २३ मे २०२५ रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन आमदार मा. दादासो अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच खासदार स्मिताताई वाघ यांनीही भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. शिबिरात उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
शिबिरात पुरवठा, निवडणूक, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे दाखले, आधार नोंदणी व दुरुस्ती, नगरपरिषद, महावितरण, पंचायत समिती व महिला बालविकास यासह विविध विभागांनी स्टॉल लावून सेवा दिली.
प्रमुख लाभांमध्ये –
- 127 नवीन व दुबार शिधापत्रिका
- 347 DBT प्रक्रिया पूर्ण, 97 नवीन अर्ज
- 245 उत्पन्न प्रमाणपत्र, 143 रहिवासी प्रमाणपत्र
- 78 जातीचे दाखले, 237 आधार दुरुस्ती
- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 18 घरकुल प्रमाणपत्र
- 3 बचत गटांना एकूण 19 लाखांचे धनादेश
- MGNREGA अंतर्गत सिंचन विहीर, गोठा शेड व जलतारा मान्यता
- 4 बालिकांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ अंतर्गत 65,000/- चे धनादेश वाटप
सदर शिबिराला 1000 ते 1200 नागरिकांनी हजेरी लावून उत्तम प्रतिसाद दिला. तहसिलदार श्री. सुराणा यांनी सर्व सहभागी नागरिक व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **