राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ जाहीर – अंश आव्हाड कर्णधार

24 प्राईम न्यूज 24 May 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांची फुटबॉल स्पर्धा २५ मेपासून शिरपूर येथील मिलिटरी स्कूलच्या क्रीडांगणावर सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची घोषणा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुख शेख यांनी केली आहे.

जळगाव संघाचा कर्णधार म्हणून अंश बबन आव्हाड याची निवड करण्यात आली आहे. हा संघ २४ मे रोजी शिरपूरकडे रवाना होणार आहे.
संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात जिल्हा संघटनेचे सचिव फारुख शेख, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, आमिर शेख, भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, निवड समिती सदस्य नितीन डेव्हिड, थॉमस डिसोझा, उदय फालक, राहील अहमद, हिमाली बोरोले, गुंजा विश्वकर्मा, वर्षा सोनवणे, इमरान शेख, तौसिफ शेख व वसीम शेख उपस्थित होते.
निवड झालेला जळगाव जिल्हा संघ:
अंश बबन आव्हाड (कर्णधार )राशिद तारिक शेख, पार्थ चंद्रशेखर पाटील, आर्यन पंकज धावरे,शौंक ब्रिजेश लाहाटी,बिलाल वसीम शेख,चैतन्य स्वप्नील पाटील,अरहम आसिफ विच्छी,एकांश दीपक तिवारी,अर्णव नितीन पाटील,रेहान आझाद पटेल,पियुष दिवाकर भिरूड,एकांश रवींद्र ढाके,अम्मर शज्जाद शेख,शेजाद आरिफ खान,गुफ्रान जोहेब सय्यद,आमेर रोहन विसाव,अथर्व गजानन पाटील. राखीव खेळाडू:अबुजार जलाल,समर सतीश चंदूध,तनुष खंबायत
प्रशिक्षक: नितीन डेव्हिड
व्यवस्थापक: वसीम शेख