शिरसाळे व मारवडमध्ये पोलिसांची कारवाई; सट्टा व गावठी दारू विक्रीप्रकरणी दोघे जेरबंद..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुक्यातील शिरसाळे व मारवड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक आणि मारवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सट्टा आणि गावठी दारू विक्री करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केली आहे.

शिरसाळे येथे छापा टाकण्यात आला असता नारायण पूणा कोळी (वय 71) हा सट्टा जुगार खेळवत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून 890 रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईत मारवड येथील बसस्टँडजवळील गॅरेजच्या मागे मनोहर संभाजी पाटील (वय 45, रा. गोवर्धन) हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांमध्ये पुढील तपास पोलिस करत आहेत.