वक्फ कायदा रद्द होईपर्यंत लढण्यासाठी सज्ज रहा. -मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जळगावच्या जलसा ए आम सभेत आवाहन..


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
ना इस्लाम खतरे मे है ना हिंदू खतरे में है लेकिन भारत का संविधान जरूर खतरे मे है.
कारण त्यांनी संविधान विरोधी वक्फ कायदा करून आम्हास संविधान बचाव साठी रस्त्यावर आणण्यास भाग पाडलेले आहे म्हणून आमची लढाई आमच्या हिंदू बांधवांशी नव्हे तर या संविधान विरोधी सरकारशी आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी संविधान धोक्यात आल्याने त्यांच्या विरोधात सज्ज राहण्याचे आवाहन केल्याने आम्ही संपूर्ण भारतभर याबाबत जनजागृती करीत असल्याचे पर्सनल लॉ बोर्डाचे वक्ते
झियाउद्दिन सिद्दिकी, मुफ्ती अशफाक व अतहर अश्रफी यांनी शुक्रवारी २३ मे रोजी जळगावच्या ईदगाह मैदानावर आयोजित सभेत केलेले आहे.
उपस्थितांचा १००% प्रतिसाद
वक्त्यांच्या या आव्हानाला उपस्थित हजारो लोकांनी दोघी हात उंचावून व घोषणेसह बोर्डासाठी शेवटच्या श्वास पर्यंत लढा देण्यासाठी तयार असल्याचे नमूद करून १००% प्रतिसाद दिला.

व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
या जाहीर सभेच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य तथा कुल जमाती महाराष्ट्रचे अध्यक्ष झियाउद्दिन सिद्दिकी (औरंगाबाद), बोर्डाचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचे दारुल कजाचे समन्वयक मुफ्ती अश्फाक (अकोला) , सुन्नीअश्रफ अकॅडमी चे प्रमुख अतहर हुसेन अश्रफी (मालेगाव) ,बोर्डाचे सदस्य मौलाना नूर मोहम्मद व कारी जहीर (भुसावळ ), जमात ए इस्लामीचे मौलाना समी (जळगाव) यांच्यासह वक्फ बचाव समितीचे समन्वयक फारुक शेख व कॉर्डिनेशन कमिटीचे समन्वय डॉ.करीम सालार व दोन्ही समितीचे अध्यक्ष मुफ्ती खालीद व मुफ्ती हारून नदवी, उद्योगपती साजिद शेख, अंजुमन तालेमुन मुस्लिमीन चे अध्यक्ष एजाज मलिक, बोहरा समाजाचे अध्यक्ष युसुफ मकरा, जामा मस्जिद चे इमाम मुफ्ती रमिज , रजा मस्जिद चे इमान मौलाना हमीद, तांबापुर सुन्नी ट्रस्ट चे तौफिक शाह आदींची उपस्थिती होती.
हिंदू विरुद्ध मुस्लिम ही लढाई नव्हे
या कायद्याला विरोध म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम ही लढाई नव्हे कारण या कायद्याविरोधात लोकसभा व राज्यसभेतील हिंदू खासदारांनी या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. एवढेच नव्हे तर सुप्रीम कोर्टात सुद्धा आमचे हिंदू वकील याची बाजू मांडत आहे. तसेच वक्फ मालमत्ता या कल्याणकारी असल्याने त्यामुळे होणारा फायदा सर्व समाजाला होणार आहे परंतु काही समाजकंटक याला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याने वेळीच त्याला उत्तर देण्यासाठी हिंदू बांधवांसोबत टेबल टॉक करा असे सुद्धा आवाहन या वक्त्यांनी केलेले आहे.
वक्फ कायद्या (काळा कायदा)बाबत जनजागृती म्हणजे काय
*वक्फ कायदा कसा संविधान व इस्लाम विरोधी आहे याबाबत सर्वसामान्यांना सविस्तर माहिती द्या.
*वक्फ च्या जमिनी व मालमत्तेची त्वरित नोंदणी करा.
*वक्फ मालमत्तेचा कोणी अपहार अथवा उत्पन्नापासून गैरव्यवहार करत असेल तर त्याच्या विरोधात सुद्धा लढा द्या व कायदेशीर कारवाई करा.
*वक्फ कायदा रद्द होईपर्यंत लढा द्या.
राजकीय पक्ष व खासदारांचे अभिनंदनाचा ठराव पारित
सभेच्या शेवटी लोकसभेत व राज्यसभेत ज्या राजकीय पक्षांनी व खासदारांनी संशोधन बिलाच्या विरोधात मतदान केले त्यांचा आभाराचा ठराव डॉ करीम सालार यांनी सादर केल्यावर त्यास उपस्थित जनसमुदायाने सर्व संमतीने मंजूर करण्यात आले.
तराना व घोषणांनी लक्ष वेधले
औरंगाबाद हुन खास आलेले डॉ. मोनीज यांनी आओ हमारे साथ चले हा उत्कृष्ट तराना (गीत) सादर केल्यावर उपस्थित जनसमुदायांनी त्यास प्रतिसाद दिला. तसेच सभेदरम्यान हाफिज रहीम पटेल,अनिस शहा, मौलाना कासीम नदवी,फारुक शेख,अन्वर सिकलगर, अमजद पठाण यांनी दिलेल्या घोषणेवर ( नारे )सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.
या सभेची सुरुवात मौलाना उमेर नदवी यांनी सादर केलेल्या कुराण पठणाने झाली त्यानंतर मौलाना कासिम नदवी यांनी नात सादर केली.
सभेचे प्रास्ताविक मुफ्ती रमीज यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती खालीद यांनी तर आभार डॉ करीम चालार यांनी मानले.
सभेची सांगता मौलाना नूर मोहम्मद यांच्या दुआ ने झाली.
सभेला जळगाव जिल्ह्यातून सुमारे २० ते २५ हजार लोकांची उपस्थिती होती.