शर्मिष्ठा यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी : मुस्लिम समाजाचा तीव्र निषेध. -प्रेषित मुहम्मद (स.अ.सल्लम) यांच्या बद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर अमळनेरमध्ये संतापाचा उद्रेक

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – पुणे येथील सिम्बायोसिस कॉलेजची विध्यार्थिनी पी. आर. शर्मिष्ठा हिने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अलैहि व सल्लम) यांच्या विरोधात अपमानास्पद आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा निषेध अमळनेर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून तिच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या नाहीत तर समाजात तणाव व द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायद्याची जाण असलेल्या पी. आर. शर्मिष्ठा यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे अत्यंत दुर्दैवी असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन अमळनेरचे अतिरिक्त प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावर यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना देण्यात आले. निवेदनामध्ये सरकारकडून योग्य ती कारवाई होईल आणि धार्मिक सलोखा अबाधित राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
धार्मिक सौहार्द टिकवण्याचे आवाहन
या प्रसंगी मौलाना रियाज़ शेख यांनी निवेदन वाचून दाखवले आणि प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्यानंतर मुस्लिम समाजात निर्माण झालेला संताप व्यक्त केला. तसेच, संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.
या वेळी मौलाना रियाज़ शेख, इकबाल कुरेशी, अल्तमश शेख, आकिब अली, इमरान भाया, शाहरुख सिंगर, मोहसिन जडी बुटी, हाफीज़ तौसीफ, इमरान शेख हाजी कादर जनाब, फैजान शेख, रिज़वान मनियार, अफजान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले.