‘१०० दिवस कार्यक्रम’मध्ये अमळनेरचा डंका; नाशिक विभागात पहिला क्रमांक..

0


रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

– राज्य सरकारच्या महसूल विभागाने राबविलेल्या ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत अमळनेर उपविभागाने नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित होते.

कार्यक्रमांतर्गत महसूल सेवांचे सुलभीकरण, ई-हक्क नोंदणी, अभिलेख अद्ययावतकरण, जलद निर्णय प्रक्रिया, तक्रार निवारण यंत्रणा यामध्ये अमळनेरने उल्लेखनीय प्रगती केली. उत्कृष्ट नियोजन, जलद अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख प्रशासनामुळे हे यश शक्य झाले.

या यशामागे सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिकांचे सामूहिक योगदान असून प्रशासनात पारदर्शकता आणि नव्या कार्यसंस्कृतीचा संदेश देणारा हा सन्मान आहे.

याच कार्यक्रमात जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांचा स्वतंत्र गौरव करण्यात आला. गाव नकाशे, फेरफार नोंद, मोजणी, आणि लोकाभिमुख उपक्रमांमधील त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.

या कामगिरीमुळे अमळनेर उपविभागाने महसूल क्षेत्रातील एक नवा आदर्श निर्माण केला असून, राज्यातील इतर उपविभागांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!