राज्यात १ जूनपर्यंत मान्सूनचं आगमन; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा..


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
24 प्राईम न्यूज 25 May 2025
महाराष्ट्रात १ जूनपर्यंत वरुणराजाचे आगमन होईल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागांत पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी या भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून सध्या गोव्याच्या वेशीवर पोहोचला असून, येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रातही धडक देणार आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यभरात पावसाच्या या आगमनामुळे तापमानात घट झाली असून, उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.