कसोटी संघासाठी शुभमन गिल कर्णधार.

24 प्राईम न्यूज 25 May 2025


टीम इंडियाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघासाठी सलामीवीर फलंदाज शुभमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कसोटी संघांची धुरा कोणाकडे दिली जाणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुभमन गिलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे, तर ऋषभ पंतची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. असा आहे भारतीय संघ शुभमन गिल-कर्णधार, ऋषभ पंत-उपकर्णधार, यशस्वी जयस्वाल, करुण नायर, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी.