प्रताप महाविद्यालयात अत्याधुनिक जिमचे उदघाट…

अंमळनेर (प्रतिनिधि)
प्रताप महाविद्यालय,अमळनेर येथील जिमखाना विभागातील अत्याधुनिक जिमचे दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी उदघाटन झाले.विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेच्या अनुषंगाने आधुनिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना एकाच जागेत विविध प्रकारचे व्यायाम करता यावेत यासाठी RUSA या संस्थेकडून महाविद्यालयास दिलेल्या अनुदानातून ही नूतन जिम तयार करण्यात आली आहे.या अत्याधुनिक जिमचा आजपासून सर्व विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.यात सायकलिंग,चेस्ट प्रेस टेबल,वेगवेगळ्या वजन प्रकारातील वेट बार,पूल बार व प्लेटस् ,डंबेल्स अशा अनेक प्रकारातील व्यायामाचे साहित्य उपलब्ध आहे. या आधुनिक व्यायामशाळेचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे,यातून विद्यार्थ्यांचे शरीर बळकट होणार आहे. असा विश्वास कार्याध्यक्ष हरी भिका वाणी यांनी व्यक्त केला. या प्रसंगी खा.शि.मंडळाचे अध्यक्ष श्री.जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौं.माधुरी पाटील,कार्याध्यक्ष मा. हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा, संचालक डॉ.अनिल शिंदे, श्री.प्रदीप अग्रवाल,श्री.नीरज अग्रवाल, सचिव प्रा.डॉ. ए. बी जैन, प्र. प्राचार्य प्रा. डॉ.एम. एस. वाघ, उप प्राचार्य डॉ. जयेश गुजराथी(IQAC प्रमुख ), उप प्राचार्य प्रा. डॉ. जि. एच निकुंभ, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. डॉ. जे. सी अग्रवाल,जिमखाना प्रमुख प्रा.डॉ. विजय तुंटे,वरिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सचिन पाटील,सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, खेळाडू, विद्यार्थी मित्र मंडळी उपस्थित होते..