अहिल्याबाई होळकर यांचा जन्मशताब्दी महोत्सव अमळनेरमध्ये उत्साहात साजरा..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 71900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अमळनेर येथे महिला मोर्चाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन महिला मोर्चा शहराध्यक्षा श्रीमती माधुरी प्रमोद पाटील यांनी केले. उपाध्यक्ष प्रा. शीला पाटील, उपाध्यक्ष ज्योती भामरे, सचिव सौ. करुणा सोनार यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. प्रा. हेमलता भोसले यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक प्रा. शीला पाटील यांनी केले.
कार्यक्रमात सौ. वसुंधरा लांडगे मॅडम यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्षीय भाषण श्रीमती माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. उषा पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
या कार्यक्रमासाठी मराठा महिला मंडळ, सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळ, योगा ग्रुप, सुवर्णकार महिला भजनी मंडळ यांची विशेष उपस्थिती लाभली. सौ. पद्मजा पाटील, अलका पाटील, नीता चौधरी, शोभा शिंदे, छाया पाटील, सुरेखा विसपुते, योगशिक्षिका सौ. कामिनी पवार, सविता पाटील आणि शोभा पांडव यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाने महिलांमध्ये एकात्मतेचा आणि सामाजिक जाणिवेचा संदेश दिला.