छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास हेडावे मंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद – 700 पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

अमळनेर तालुक्यातील हेडावे मंडळ भागातील विविध गावांतील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या दि. 25 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आयोजित करण्यात आले. हे शिबीर दिनांक 30 मे 2025 रोजी (शुक्रवार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सडावण बु. येथे पार पडले.
या शिबीराचे उद्घाटन मा. आमदार दादासो. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर आमदार पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शिबीरात प्रमुख उपस्थिती मा. उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी श्री. नरेंद्र पाटील, उपअधिक्षक भूमिअभिलेख श्रीमती स्मिता गावित यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली होती.
प्रत्येक विभागाने आपआपले स्टॉल उभारून नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित तक्रारींचे निराकरण केले. यामध्ये शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना विविध सेवा आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
शिबीरामध्ये देण्यात आलेल्या प्रमुख सेवा पुढीलप्रमाणे:
103 नवीन व दुबार शिधापत्रिका 217 लाभार्थ्यांना डीबीटी प्रक्रिया पूर्ण 331 उत्पन्नाचे दाखले57 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 53 रहिवासी प्रमाणपत्र 17जातीचे दाखले113 आधार नोंदणी, 267 आधार दुरुस्ती18 पात्र लाभार्थ्यांना शिधा वाटप 81 सनद वाटप
7/12 उतारा दुरुस्ती व वाटप– 17, 21, इत्यादी
जलतारा योजनेंतर्गत – 17 प्रशासकीय मान्यता
या शिबीरात अंदाजे 700 ते 800 नागरिकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाची सांगता तहसिलदार श्री. सुराणा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून केली.
हे समाधान शिबीर प्रशासन व नागरिक यांच्यातील संवादाचे उत्तम उदाहरण ठरले असून, यामुळे अनेक गरजूंना थेट सेवा मिळाल्याचा अनुभव लाभला.