उमेश आनंद व झी टीव्ही वर कायदेशीर कारवाई करा=एकता संघटनेची मागणी..

24 प्राईम न्यूज 4 Jun 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

२ जून रोजी झी टीव्ही च्या ताल ठोक के या कार्यक्रमांतर्गत वाराणसी आखाड्याचे उमेश आनंद पंडित यांनी अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) व त्यांच्या धर्मपत्नी आयेशा (र) यांच्याबाबत अपशब्द व अपमानास्पद व चारित्र हनन करणारे वक्तव्य केल्याने त्या वक्तव्याचा तीव्र निषेध एकता संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून केला.
घोषणा, चित्र फाडून व पायी तुटवून निषेध
यावेळी उमेश आनंद पंडित याला त्वरित अटक करावी, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे कार्यवाही करावी, तसेच या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता प्रितेश खरे व प्रसारण करणारी झी टी व्ही यांच्यावर सुद्धा कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी एक मुखी मागणी एकता संघटने मार्फत करण्यात आली.
उमेश आनंद हाय :हाय :,
उमेश आनंद मुर्दाबाद
उमेश आनंदा यांना अटक करा
अटक करा
या घोषणा देत त्याचे छायाचित्र पायदळी तुटवण्यात आले.
जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना तक्रार अर्ज दाखल
उमेश आनंद पंडित व झी टीव्ही चे मालक तसेच ताल ठोक के या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता प्रितेश खरे यांच्यावर महाराष्ट्रात सदर कार्यक्रम प्रसारित झाल्याने व तो आम्ही बघितल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, तसेच यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाले व आमच्या प्रेषितांचे अपमान झाले म्हणून तक्रार नोंदवावी असा अर्ज एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी केला आहे.
या तक्रारीची प्रत राज्यपाल, महाराष्ट्र राज्य , अध्यक्ष मानव अधिकार महाराष्ट्र ,पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस अधीक्षक जळगाव, पो नी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव तसेच मुख्यमंत्री सचिवालय जळगाव यांना देण्यात आले आहे.
भाषण द्वारे यांनी व्यक्त केला तीव्र संताप
तौफिक शाह, शफीक नदवी, मौलाना उमेर, मुफ्ती रमीज, मुफ्ती खालिद व फारुक शेख यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत भविष्यात आता जशास तसे उत्तर देण्यात येईल आता प्रेषितांचा अपमान सहन केला जाणार नाही.
निदर्शना मध्ये यांचा होता सहभाग
मुफ्ती खालिद , मुफ्ती रामिज, म हाफिज रहीम पटेल , मौलाना तौफिक शाह, मौलाना उमेर नदवी ,फारुक शेख, अनिस शाह, अन्वर शिकलगार, शाहीर तेली, मुक्ताईनगर चे हकीम चौधरी, कलीम रसूल , शेख अहमद, नशिराबाद चे फजल कासार, पाळधी चे मतीन देशपांडे, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान ,पटेल बीरादारीचे जकी इद्रिस पटेल, मन्यार बिरादरीचे सैयद चांद, उस्मानिया चे समीर राईस, शेख सलीम, शेख खलील अहमद , आदींचा समावेश होता.