गुरांचा बाजार सुरू राहील गोसेवा आयोगाचे सुधारित पत्र..

24 प्राईम न्यूज 4 Jun 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

गोसेवा आयोग यांनी २७/५/२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना पत्राद्वारे आदेशित केले होते की “बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या आठवड्यात दिनांक ३/६/२५ ते ८/६/२५ या कालावधीत आपल्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गुरांचा बाजार भरणार नाही याची दक्षता घ्यावी”
असे पत्र प्राप्त झाल्याने जळगाव जिल्हा एकता संघटनेने माननीय मुख्यमंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यासह पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक जळगाव, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जळगाव तसेच सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती व सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना पत्र देऊन गुरांचा बाजार बंद करू नये ज्यामुळे शेतकरी, मजूर, दलाल चालक, वाहन यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते.
गोवंश हत्या बंदीचा कायदा महाराष्ट्रात असल्याने कोणीही मुस्लिम समाजाचा व्यक्ती या महाराष्ट्रात गोवंश ची कत्तल कुर्बानी करत नाही असे असताना सुद्धा गुरांचा बाजार बंद ठेवणे योग्य नाही.
३ जून रोजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिवांशी भेट घेऊन चर्चा केली होती.
आमदार अबू आझमी साहेब व आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाला आपले २७/५/२५ चे पत्र मागे घ्यायला लावले असून २/६/२५ च्या पत्र क्रमांक ८९६ नुसार त्यांनी शुद्धिपत्रक सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवले असून त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या आठवड्यात दिनांक ३/६/२५ ते ८/६/२५ या कालावधीत आपल्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गुरांचे बाजार भरवण्यात यावे
सदर पत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवले असले तरी जळगाव एकता संघटनेतर्फे सर्व मुस्लिम समाजांना आव्हान करण्यात येते की त्यांनी गोवंश ची कुर्बानी न देता इतर प्राण्यांची कुर्बानी द्यावी व त्यासाठी कोणी आपणास अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अथवा आम्हास सूचित करण्यात यावे असे आवाहन एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी केले आहे.
सोबत
“गो सेवा आयोग चे २/६/२५ चे पत्र”