गांधलीपूरा भागातील धोकादायक विद्युत खांब हटवण्याची मागणी; वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – शहरातील गांधलीपूरा परिसरात घरालगत असलेला धोकादायक विद्युत खांब स्थानिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. घरमालक शेख युनूस हकीम बेलदार यांनी सांगितले की, या खांबामुळे परिसरातील लहान मुले, महिला आणि वृद्धांना धोका निर्माण झाला असूनही वीज वितरण कंपनी तो हटवायला तयार नाही.

त्यांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी हा खांब हटवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.