पाकिस्तानात टिक टॉक स्टार सना युसूफची गोळ्या घालून हत्या; नातेवाईकावर संशय..

24 प्राईम न्यूज 4 Jun 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

– पाकिस्तानातील प्रसिद्ध टिक टॉक स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सना युसूफ हिची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना राजधानी इस्लामाबादमध्ये घडली असून, ऑनर किलिंगचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक वृत्तानुसार, सना युसूफवर तिच्याच एका नातेवाईकाने गोळीबार केला. तो तिच्या घरी भेटीसाठी आला होता आणि काही क्षणातच त्याने सनावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोन गोळ्या लागल्याने सनाचा जागीच मृत्यू झाला.
गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस विविध अंगाने तपास सुरू करत आहेत. ऑनर किलिंगसह इतर संभाव्य कारणांचीही चौकशी सुरू आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.