एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! महागाई भत्त्यात ७% वाढ..

24 प्राईम न्यूज 4 जुन 2025


राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना जून २०२५ पासून महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ मिळणार आहे. त्यामुळे सध्याचा ४६% महागाई भत्ता आता ५३% केला जाणार आहे, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. याशिवाय, कर्मचाऱ्यांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ किंवा ‘धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना’ यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी १ कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिलासा – मोफत प्रवास पास आता ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी मिळणार!
बैठकीत महागाई भत्त्याची थकबाकी, एसटीचे उत्पन्नवाढीचे उपाय व इंधन बचतीवरही चर्चा झाली. थकबाकीचा निर्णय निधीच्या उपलब्धतेनुसार घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.