मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर..

0

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 5 जून रोजी अमळनेर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन शिवसेना अमळनेर व यशोदा फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी 9 वाजेपासून शिवसेना संपर्क कार्यालय, भांडारकर कंपाऊंड (खड्डाजीन), बस स्टँडसमोर, भागवत रोड येथे होणार आहे. शिबिराचे उद्घाटन पारोळा-एरंडोलचे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील आणि महिला जिल्हाप्रमुख सरिता (माळी) कोल्हे उपस्थित राहणार आहेत.

नेत्रतपासणी डॉ. श्रद्धा मोरे व डॉ. प्रशांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. तालुक्यातील गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शहरप्रमुख संजय कौतिक पाटील आणि इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!