पायलटने विमान उडवण्यास नकार दिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर अडकले!

0

24 प्राईम न्यूज 7 जुन 2025. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पायलट गेल्या १२ तासांपासून सलग विमान चालवत होता. त्यामुळे त्याला तीव्र थकवा जाणवू लागला आणि प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच त्याने पुढील उड्डाण घेण्यास स्पष्ट नकार दिला.

एकनाथ शिंदे मुक्ताईनगर दौरा आटोपून तातडीने मुंबईला जाण्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले होते. मात्र, नियोजित वेळेस विमान उडण्याऐवजी पायलटने प्रकृतीच्या कारणामुळे आणि तांत्रिक अडचणींचा हवाला देत उड्डाणास नकार दिला.

घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी तिन्ही पायलटांसोबत चर्चा केली. वैमानिकांच्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकाला देखील विमानतळावर बोलवण्यात आले आहे.

सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचा ताफा जळगाव विमानतळावर थांबलेला असून, पुढील उड्डाणासाठी नवीन व्यवस्था किंवा पायलटची तब्येत स्थिर होण्याची वाट पाहिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!