ईदनिमित्त मतिमंद बांधवांना फलवाटपाचा उपक्रम..

24 प्राईम न्यूज 8 Jun 2025

धरणगाव – ए. पी. जे. अब्दुल कलाम विचार मंच, धरणगाव यांच्या वतीने ईद सणाच्या निमित्ताने सोनबर्डी (ता. एरंडोल) येथील सहवास मतिमंद निवासी संस्थेतील मतिमंद बांधवांना फलवाटप करण्यात आली.

या उपक्रमात विचार मंचाचे अध्यक्ष करीम खान, उपाध्यक्ष रहेमान शाह, सचिव शफी शाह साहेब, सल्लागार हाजी हफीज़ोद्दीन साहेब, सहसचिव नदीम काज़ी, तसेच सदस्य सज्जाद अली सैय्यद या सर्व पदाधिकाऱ्यांनी मतिमंद बांधवांच्या हस्ते फळांचे वाटप केले.

सामाजिक बांधिलकी जपत ईदच्या आनंदात मतिमंद बांधवांनाही सहभागी करून घेतल्यामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. विचार मंचाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.