अमळनेर बस स्थानक मॉडेल बनणार – २५ नवीन एसटी बसेसची घोषणा; पाच बस थाटात दाखल..

0

आबिद शेख/अमळनेर



अमळनेर रा.प.म.एस.टी. आगारात पाच नवीन एसटी बसेस दाखल झाल्याचा लोकार्पण सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील, विनोदभैय्या पाटील, आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, आगार प्रमुख अनिकेत न्हायदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात पाचही नव्या बसेस फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “अमळनेर आगारासाठी एकूण २५ नवीन बसेसची मागणी केली असून त्यापैकी दहा बसेस मंजूर झाल्या आहेत. सध्या पाच बस प्राप्त झाल्या असून उर्वरित पाचही लवकरच दाखल होतील.”

तसेच, ९ कोटींच्या निधीतून सुरू असलेले स्थानकाचे नूतनीकरण काम देखील लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित स्थानकाचे काम पूर्ण करून अमळनेर बस स्थानक ‘मॉडेल स्थानक’ बनवण्याचा आमचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांचे सहकार्य लाभत असल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.

वाजतगाजत बस रॅली, आमदारांचा सहभाग

आमदार अनिल पाटील स्वतः बसमध्ये विराजमान होऊन, डीजेच्या तालावर वाजतगाजत या बस धुळे रस्त्यावरून अमळनेर स्थानकात घेऊन आले. या बस रॅलीत पत्रकार, एसटी अधिकारी, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. स्थानकात आमदारांनी स्वतः स्टेयरिंग हातात घेऊन चालक-वाहकांचे उत्साहवर्धन केले.

या नव्या बसेसच्या आगमनामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे बंद झालेल्या काही फेऱ्याही पुन्हा सुरू होतील, असे आमदारांनी सांगितले. विद्यार्थ्यांची व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे या कार्यक्रमाला एसटी कामगार संघटनेचे एल.टी. पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, अर्बन बँक संचालक प्रविण जैन, भास्कर बोरसे, महेंद्र पाटील, प्रा. सुनील पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे प्रमोद बाविस्कर, विजय वाडेकर, पूनम जाधव, तुषार साळुंखे, मुकेश सैदाने, सतीश सातपुते, संदीप साळी, मनोज पाटील, दर्शन सोमवंशी, निलेश कंखरे, सौ. धनगर, सौ. अहिरे, नितीन पाटील, चंदू बोरसे, संजय मोरे, गजानन सूर्यवंशी, नरहरी पाटील व युनियनचे सर्व पदाधिकारी, वाहक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!