सचिन पाटील ठरले ‘रवि ज्वेलर्स’च्या इलेक्ट्रीक बाईक ड्रॉचे भाग्यवान विजेते.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील सराफ बाजारात नव्याने सुरू झालेल्या ‘रवि ज्वेलर्स’ या सुवर्ण दालनाच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ऑफर लकी ड्रॉचा निकाल 6 जून रोजी जाहीर झाला. या ड्रॉमध्ये सुंदरनगर येथील सचिन देवीदास पाटील यांनी पहिल्या बक्षीसाची म्हणजेच इलेक्ट्रीक बाईकची लॉटरी जिंकत यश मिळवलं.

या ऑफरचा कालावधी 6 एप्रिल ते 6 जून असा होता, ज्यामध्ये 22 कॅरेट 916 हॉलमार्क दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग घ्यायची संधी मिळाली होती. एकूण 101 भाग्यवान विजेते यामध्ये निवडण्यात आले.

या सोहळ्याला माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी एस. ओ. माळी (सेवानिवृत्त उपप्राचार्य, प्रताप महाविद्यालय), अमेय मुंदडा (मुंदडा बिल्डर्स), ललितजी गुजराथी, विजयकुमार वर्मा, आणि रवि ज्वेलर्सचे परिवार सदस्य उपस्थित होते.
इतर प्रमुख विजेत्यांमध्ये –
वसीम पटवा (दुसरे बक्षीस – रेफ्रिजरेटर)
विकास शांताराम बडगुजर, मांडळ (तिसरे बक्षीस – वॉशिंग मशीन)
एस. ओ. माळी (चौथे बक्षीस – 32 इंची टी.व्ही.)
याशिवाय, 5 होम थिएटर, 10 मिक्सर, 31 डिनर सेट आणि 51 पैठणी अशा एकूण 101 विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
ग्राहकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल रवि ज्वेलर्सचे मालक रवि वर्मा यांनी सर्व ग्राहकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे मन:पूर्वक आभार मानले.