अमळनेरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त भव्य जनजागृती कार्यक्रम; उज्वल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य सादर..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अमळनेर नगरपरिषद, मंगळग्रह संस्थान आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळग्रह मंदिर परिसरात जनजागृतीमूलक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उज्वल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम विषद करण्यात आले. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठी नाटकाद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला गेला. उपस्थित नागरिकांना पर्यावरण रक्षणाची शपथही देण्यात आली.
या कार्यक्रमात गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, मदन लाठी, विक्रम अस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती. उज्ज्वल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री स्वप्नील बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमास मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एम. पाटील, सहसचिव दिलीप बहीराम, विश्वस्त अनिल अहिराव, जयश्रीताई सादे, प्रकाश मेरवा तसेच सेवेकरी आर.टी. पाटील, व्ही.व्ही. कुलकर्णी, नरेंद्रसिंग तुंबा गिरासे, उज्वला शहा, वसुंधरा लांडगे आदींची उपस्थिती लाभली.
तसेच माजी आमदार आणि कृषी भूषण श्री साहेबराव पाटील, माजी जिल्हाप्रमुख जयश्रीताई पाटील, प्रांताधिकारी श्री मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निकम सर, नगर परिषदेचे सीईओ तुषार नेरकर, स्वच्छता निरीक्षक संतोष बिर्हाडे, सामाजिक कार्यकर्ते शरद सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमळनेरमधील विप्रो कंपनीचे विजय बिग्जलीवाले, जितेंद्र शर्मा, जी. वेन्कटेसाई, सुधीर बडगुजर, भावेश साळूखे, मानसी कापसे, सुनील सोनवणे यांचाही सहभाग होता. तर आधार संस्थेचे सीएसआर पार्टनर दिप्ती गायकवाड, योगिता पाटील, मोहिनी धनगर, भावना सूर्यवंशी यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जिल्हाधिकारी करणसिंग राजपूत, उपअधिकारी राजेंद्र सूर्यवंशी आदी अधिकाऱ्यांनी देखील पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात भक्तांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.