डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, अमळनेर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु..

0


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ८ वी पासून महाविद्यालयीन, तंत्रनिकेतन तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अपंग व अनाथ विद्यार्थी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून, त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य व अन्य आवश्यक सुविधा दिल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही गृहपालांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!