अमळनेरचा ताडे तलाव होणार नव्या रूपात सज्ज – पर्यटनासाठी विकसित होणार आकर्षक पिकनिक स्पॉट!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील ताडे तलाव लवकरच नव्या रूपात साकारणार आहे. नगरविकास विभागाकडून मंजूर झालेल्या ५ कोटी ४३ लाख रुपयांच्या निधीतून तलावाचे रूपडं पालटणार असून, पुढील दोन वर्षांत हा तलाव सुंदर पिकनिक स्पॉट म्हणून अमळनेरकरांना खुला होणार आहे. ही माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली.

या विकासकामांमागे माजी मदत व पुनर्वसन मंत्री व विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांचे मोलाचे योगदान असून, त्याच्याच पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. कामास सुरुवात झाली असून, तालुक्यातील पर्यटनदृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे ताडेनाल्याचा इतिहास आणि गरज चोपडा रोडलगत असलेला ताडेनाला पूर्वी गणेश विसर्जनासाठी प्रसिद्ध होता. मात्र, अलिकडच्या काळात दुर्लक्षित झाल्याने नाल्याची दुरवस्था झाली होती. पावसात नाल्याला पूर येऊन आजूबाजूच्या भागात पाणी घुसण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी शाश्वत आणि सुंदर विकासाची गरज होती काय-काय होणार विकासात?
पुढील कामे या निधीतून करण्यात येणार आहेत:
३ लाख : डेटा संकलन, सर्वेक्षण व जलविश्लेषण. २ कोटी : जैविक पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया (MBBR) ४५ लाख : महिला-पुरुषांसाठी शौचालय बांधकाम ५० लाख : तलावाभोवती फेन्सिंग, चेनलिंक व भराव २५ लाख : निर्माल्य कलश व मूर्ती विसर्जन टाकी ३० लाख : गटार बांधकाम (चेंबरसह) ४५ लाख : वृक्षारोपण, पेव्हर ब्लॉक, उद्यान विकास २५ लाख : सौरविद्युत यंत्रणा २५ लाख : सौर विसर्जन यंत्रणा ७.५ लाख : विश्रांती बेंचेस ५ लाख : जनजागृती कार्यक्रम ८२.८९ लाख : कर (टॅक्स) या कामांमुळे ताडे तलाव परिसर निसर्गरम्य, पर्यावरणपूरक आणि नागरिकांसाठी आकर्षण केंद्र ठरेल. तसेच मंगळग्रह मंदिर येथे येणाऱ्या भाविकांसाठीही हे एक सुंदर थांबा ठरणार आहे.
