“माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या निवासस्थानी शॉर्टसर्किटने घेतली आग – सुदैवाने मोठा अनर्थ टळला!”

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर शहरातील माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्या न्यू प्लॉट भागातील निवासस्थानाला दुपारी 4.30 वाजता स्टोअर रूम मध्ये शॉर्टसर्किटने आग लागली असता डॉ. पाटील शेजारीच रूम मध्ये झोपले होते.त्यांना या आगीच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे ते पटकन रूम बाहेर पडले असता सर्वत्र काळाकुट्ट धूर पसरलेला होता. त्यांनी तात्काळ पत्नी सुनीता पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील, संदीप सोनवणे यांना संपर्क करून घटनेबाबत माहिती दिल्यामुळे त्यांनी मिळून लगेच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला देखील प्राचारण करण्यात आले होते. त्याचबरोबर महावितरण विभागाने देखील तात्काळ अपार्टमेंटचा विद्युत पुरवठा खंडित केला होता.
मुख्याधिकारी तुषार नेरकर व गणेश गोसावी यांनी तात्काळ अग्निशमन बंब पाठवला. अग्निशमन दलाचे दिनेश बिऱ्हाडे ,फारुख शेख , जफर पठाण , आकाश संदानशिव यांनी आग आटोक्यात आणली.