“विमान अपघातातील मृतांना भाजपा अमळनेरची श्रद्धांजली; पाडळसरे धरणास PIB मान्यता – विकास आणि संवेदनशीलतेचा समतोल”

0

आबिद शेख/अमळनेर
आज अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही दुर्दैवी निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपा अमळनेरच्यावतीने महाराणा प्रताप चौक येथे अपघातग्रस्त नागरिकांना आणि स्वर्गीय विजय रुपाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळत मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. कोणताही जल्लोष अथवा औपचारिक उत्सव टाळून, कार्यक्रम संयम व गंभीरतेने पार पडला.

आजचा दिवस अमळनेरसाठी आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा ठरला. केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड (PIB) कडून पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पासाठी ₹८५९ कोटींची आर्थिक मान्यता मिळण्याचे संकेत समोर आले आहेत. हा प्रकल्प अमळनेर व परिसराच्या कृषी आणि सिंचन विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मात्र देशातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी कोणतीही घोषणा किंवा साजरा न करता, संवेदनशीलतेचे उदाहरण ठेवले. विकास आणि मानवतेचा समतोल साधण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या श्रद्धांजली सभेला भाजपा शहराध्यक्ष योगेश महाजन, तालुका अध्यक्ष राहुल पाटील, डॉ. अनिल शिंदे, संदीप पाटील, नगरसेवक श्याम पाटील, महेश पाटील, हरचंद लांडगे, महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे, समाधान पाटील, सुभाष पाटील, भरतशिंग परदेशी, रमेश देव शिरसाठ, सौरव पाटील, कल्पेश पाटील, तिल्लोतमा पाटील, नरेंद्र पाटील, नरेंद्र सोनवणे, भावेश जैन, सागर शेठे, राजेश खरारे, मनीषा पाटील, अक्षय पाटील, निखिल पाटील, आकाश पाटील व असंख्य भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाने एकात्मता, मानवता आणि जबाबदारीची जाणीव अधोरेखित करत समाजासमोर एक आदर्श मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!