छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीरास मारवड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर” अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यातील मारवड येथे एक दिवसीय शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबीर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, मारवड येथे पार पडले.

शिबीराचे उद्घाटन मा. आमदार दादासो अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मा. खासदार स्मिताताई वाघ यांनीही शिबीराला भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
या शिबीरात उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, तालुका कृषी अधिकारी, तसेच इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि आधार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. एल. जी. चौधरी यांनी शिबीराचे सूत्रसंचालन केले.
शिबीरात विविध विभागांच्या स्टॉल्सद्वारे नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले आणि विविध योजनांचे लाभही वितरित करण्यात आले. शिबीरात खालीलप्रमाणे लाभ देण्यात आले: प्रमुख लाभ व वितरणाचा तपशील शिधापत्रिका विभाग: 67 नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप संगायो विभाग: 3 लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश. निवडणूक विभाग 13 नवमतदारांचे नमुना 6 भरून घेणे 2 स्थलांतरित मतदारांचे नमुना 8 भरून घेणे सेतु कार्यालय 265 DBT प्रक्रिया पूर्ण 12 नवीन लाभार्थी अर्ज 175 उत्पन्नाचे दाखले 24 रहिवासी प्रमाणपत्र 75 जातीचे दाखले 22 आधार नोंदणी 72 आधार दुरुस्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत 25 सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता 10 गोठा शेड मंजूर 34 जलतारा प्रकल्पास मान्यता या शिबीरास 600 ते 700 नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग लक्षणीय होता श्री. गौरव शिरसाठ, मंडळ अधिकारी, टाकरखेडा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
