एअर इंडिया अपघात: दोघेही को-पायलट मुंबई आणि बदलापूरचे; उड्डाणापूर्वी घरच्यांना केला शेवटचा फोन..

0

आबिद शेख/अमळनेर



एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनने अचानक काम करणे थांबवल्याने विमान कोसळले. मुख्य पायलट क्लाईव्ह कुंदर तसेच को-पायलट दीपक पाठक आणि सुमित सबरवाल यांनी अंतिम क्षणांपर्यंत नियंत्रण राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र वेळ अपुरा ठरला. विमान मुंबई विमानतळावर पोहोचण्याआधीच रहिवासी भागात कोसळले.

या दुर्घटनेतील दोन्ही को-पायलट महाराष्ट्रातीलच असून दीपक पाठक हे बदलापूरचे तर सुमित सबरवाल हे पवई, मुंबईचे रहिवासी होते.

दीपक पाठक मागील ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते. त्यांनी अपघातापूर्वी आपल्या आईशी संवाद साधत, “अहमदाबादला आहे, आता लंडनला निघणार आहे,” असे सांगितले होते. अपघातानंतर त्यांचा फोन सुरुवातीला नॉट रिचेबल लागत होता, आता मात्र फोन वाजत आहे, पण संपर्क होत नाही, असे त्यांच्या बहिणीने सांगितले.

दुसरे को-पायलट सुमित सबरवाल टेकऑफ करण्यापूर्वी आपल्या ८८ वर्षांच्या वडिलांशी बोलले होते. “लंडनला पोहोचलो की पुन्हा फोन करीन,” असे त्यांनी सांगितले होते. अपघातानंतर त्यांच्या वडिलांसोबत आता फक्त मुलगी आणि नातवंडे आहेत. सुमित यांच्या बहिणीने दिल्लीतून मुंबईकडे तातडीने प्रयाण केले आहे.

एअर ट्रॅफिक कंट्रोलला पायलटने “मे डे, मे डे” असा संदेश दिला होता, मात्र त्यानंतर पायलटकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!