आखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक जमात् अमळनेर च्या वतीने सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन..

आबिद शेख/ अमळनेर


आज अमळनेर शहर व ग्रामीण खाटीक जमाततर्फे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मुखतार खाटीक यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून, इजतेमाई (सामूहिक) शाद्यांविषयी निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दिनांक ५ फेब्रुवारी २०२६, गुरुवारी सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्याचे निश्चित करण्यात आले.
या पवित्र उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी दिलखुलास मदतीची घोषणा केली आहे. त्यांनी आपले आर्थिक योगदान देत या उपक्रमाला हातभार लावला. अल्लाह करिम हे सर्व दान स्वीकारो, आमीन.
महत्वाची विनंती
सर्व बांधवांना विनंती करण्यात येते की, आपल्या नातेवाईकांमध्ये या कार्यक्रमाची माहिती पोहोचवावी आणि अधिकाधिक विवाह जुळविण्याचा प्रयत्न करावा.
🔸 विनंतीकर्ते:
सदर व सदस्य, खाटीक जमात, अमळनेर