ग. स. सोसायटी जळगाव आयोजित सत्कार सोहळ्यात गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गौरव..


24 प्राईम न्यूज 15 Jun 2025
जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. (ग. स. सोसायटी) जळगावच्या वतीने आज भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भाऊसाहेब गंधे सभागृह, शेठ ला. ना. माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे संपन्न झाला.
या सोहळ्यात आदर्श शिक्षक, ज्येष्ठ सभासद तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
विशेषतः मोहसीन खान अजिज खान, पदवीधर शिक्षक, जि. प. उर्दू शाळा, फुलेनगर, पाळधी यांना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती अस्मिता ताई वाघ (जळगाव लोकसभा) व आमदार मा. ना. श्री मंगेश चव्हाण (चाळीसगाव) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या यशस्वी सोहळ्याच्या आयोजनासाठी ग. स. सोसायटी जळगावच्या सर्व संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले.