हिंगोणे बु. येथे वीज पडून गाभण म्हैस ठार; शेतकऱ्याची भरपाईची मागणी..

आबिद शेख/अमळनेर

हिंगोणे बु. (ता. अमळनेर) येथे वीज पडून एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेली गाभण म्हैस ठार झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक १२ जून रोजी रात्री ९:३० वाजता घडली. या नुकसानीमुळे शेतकरी प्रवीण मखमल पाटील यांनी शासनाकडे भरपाईची मागणी केली आहे.
प्रवीण मखमल पाटील यांची अंदाजे ७५ हजार रुपये किमतीची गाभण म्हैस त्यांच्या गोठ्यात बांधलेली होती. त्या रात्री जोरदार वादळासह वीज पडल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच १३ जून रोजी तलाठी प्रशांत पवार आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्याने तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.