अमळनेरमध्ये लहान मुलांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर. — 19 जूनला नर्मदा मेडिकल फाऊंडेशन आणि एसएमबीटी हॉस्पिटलचा उपक्रम

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – नर्मदा मेडिकल फाऊंडेशन आणि एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर शहरात गुरूवार, 19 जून 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान लहान मुलांसाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पालकांनी आपल्या मुलांमध्ये खालील लक्षणे असल्यास त्वरित शिबिराला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे वजन न वाढणे चालताना किंवा बोलताना दम लागणे हातपायाची बोटं आणि त्वचा लालसर होणे सतत खोकला येणे जीभ, डोळे व ओठ निळसर दिसणे चार ते पाच दिवसांहून अधिक ताप राहणे. शिबिरातील वैशिष्ट्ये:

बीपी, शुगर, ईसीजी तपासणी (सल्ल्यानुसार) महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व रेशनकार्डधारकांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया मोफत अॅन्जिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी व बायपास सर्जरी वयोगट 0 ते 18 वयोगटासाठी मोफत 2D इको तपासणी व नाव नोंदणी

शिबिराचे मार्गदर्शक तज्ज्ञ:
डॉ. गौरव वर्मा — M.B.B.S., M.D., D.N.B. (Med.), D.M. Cardiology
(पूर्णवेळ कन्सल्टंट, एसएमबीटी हॉस्पिटल)

ठिकाण:
अस्मी सीटी स्कॅन आणि डायग्नोस्टिक सेंटर, नर्मदा मेडिकल फाऊंडेशन जवळ, यशवंत नगर, मराठा मंगल कार्यालयाजवळ, अमळनेर

नाव नोंदणीसाठी संपर्क:
📞 9145001658 / 9850789504

रुग्णांसाठी विशेष सोय:
एसएमबीटीतर्फे सोमवारी ते शनिवारपर्यंत विशेष बससेवा – नाशिकसाठी संपर्क: 9145001651


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!