वॉर्ड क्रमांक १४६ चे केंद्र न्यु प्लॉट भगिनी मंडळ शाळेत हलवावे : माजी नगरसेवक मुन्ना शर्मा यांची मागणी..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ पार पडण्याच्या तयारीत असताना, माजी नगरसेवक चंद्रकांत भगवानदास शर्मा (उर्फ मुन्ना शर्मा) यांनी मतदान केंद्र क्रमांक १४६ बाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे. सध्या या वॉर्डमधील मतदान केंद्र ग्लोबल स्कूल येथे असून, ते केंद्र नागरिकांना विशेषतः वयोवृद्ध मतदारांना पोहोचण्यासाठी सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मतदारांचा मतदानात सहभाग कमी होत आहे, असे शर्मा यांनी निदर्शनास आणले आहे.

या पार्श्वभूमीवर, श्री. शर्मा यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत वॉर्ड क्रमांक १४६ चे मतदान केंद्र न्यु प्लॉट भगिनी मंडळ शाळेत हलवण्याची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या ठिकाणी केंद्र केल्यास ते सर्व मतदारांना जवळ पडेल, तसेच मतदानाची टक्केवारीही वाढेल.

मुन्ना शर्मा हे माजी नगरसेवक, माजी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष तसेच दि अर्बन बँकचे माजी चेअरमन असून, त्यांनी यापूर्वीही विविध नागरी प्रश्नांवर भूमिका घेतली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी नागरिकांमध्येही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!