एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेच्यावतीने सकस आहार व प्रोटीन किट वाटप..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर | रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या अंकुर सेवा सेतू प्रकल्प अंतर्गत एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कै. वसंत माधव अमृतकर यांच्या पुण्यस्मरणार्थ ३० गरजू बालकांना प्रत्येकी किराणा व प्रोटीन किट तसेच ६ वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीमती पुष्पा अमृतकर अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्यासोबत अमरदीप अमृतकर व त्यांच्या सुनबाईंनी मुलांना किटचे वितरण केले.
कार्यक्रमात आधार संस्थेचे श्री. आनंद पगारे यांच्या कडून ३० पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. गेल्या पाच वर्षांपासून सलग हा उपक्रम दर महिन्याला राबवला जात असून, गरजू मुलांना नियमित पोषण मिळावे हा यामागील हेतू आहे.
या वेळी आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक करताना मुलांशी आरोग्यविषयक संवाद साधला. त्यांनी आपल्या मनोगतातून अधिकाधिक दात्यांनी पुढे येऊन या मुलांना मदत करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात आधार संस्थेचे कार्यकारी संचालक रेणु प्रसाद, रोटरी क्लब अध्यक्ष ताहा बुकवाला, तसेच श्री. अभिजित भांडारकर, किशोर लुल्ला, वृषभ पारेख, देवेंद्र कोठारी, रोहित सिंघवी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कापडे, पुनम पाटील, आनंद पगारे, मोहीनी धनगर, राहुल पवार, भावेश मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले.