अमळनेर शाहाआलम नगर भागात मोकाट डुकरांचा उपद्रव; नागरिक त्रस्त..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – शहरातील शाहाआलम नगर भागात मोकाट डुकरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा भाग दाट वस्तीचा असून गल्लीबोळांत हे मोकाट डुकरे मुक्तपणे फिरत आहेत यातच रात्री लाईट बंद असतात घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही
सदर भागात शाळेत जाणारी लहान मुले-मुली तसेच नागरिक यांना ये-जा करताना भीती वाटते. डुकरांच्या मोकाट वावरामुळे कधीही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक वेळा या डुकरांमुळे लहान मुलांना घाबरावे लागते, तर काही वेळा वाहतूकही अडथळलेली पाहायला मिळते.
नागरिकांनी यापूर्वीही वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
“शाळेत जाणाऱ्या आमच्या मुलांना भीती वाटते. गल्लीबोळांमध्ये डुकरं धावतात, कधी काय होईल सांगता येत नाही. प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करावी,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.
या समस्येचा लवकरात लवकर बंदोबस्त न झाल्यास नागरिकांतून तीव्र संताप उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने कारवाई करून डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.