प्रताप कॉलेजचे उपप्राचार्य उल्हास गोविंद मोरे यांचे दुःखद निधन..

आबिद शेख/ अमळनेर

अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक बातमी आहे की प्रताप कॉलेज, अमळनेर येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. उल्हास गोविंद मोरे सर यांचे आज संध्याकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
उल्हास मोरे सर हे एक समर्पित शिक्षक होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय असून, त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही मोलाची भूमिका बजावली होती. शांत, संयमी आणि विद्यार्थीप्रिय असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते सहकारी शिक्षकांपर्यंत प्रत्येकजण त्यांच्यावर विशेष प्रेम करत असे.
त्यांच्या निधनाने प्रताप कॉलेज परिवार, खानदेशी शिक्षण मंडळ तसेच संपूर्ण अमळनेर परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी प्रताप कॉलेजचा संपूर्ण परिवार, पत्रकार मित्र आणि खानदेशी शिक्षण मंडळ त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक श्रद्धांजली वाहतो व या दुःखात सहभागी आहे.
त्यांची अंतिम यात्रा उद्या रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.